Maharashtra Political Crisis : Ajit Pawar शपथविधीनंतर प्रथमच मंत्रिमंडळात बैठकीला उपस्थित राहणार
Continues below advertisement
अजित पवारांनी राजकीय भूकंप घडवल्यावर आज दिवस खूप महत्त्वाचा आहे. आज मुंबईत अनेक बैठका होणार आहेत. अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आज मंत्रिमंडळाची पहिली बैठक होणार आहे. या शिवाय उद्याच्या राष्ट्रवादीच्या बैठकीचं नियोजन करण्यासाठी अजित पवार सकाळी ११ वाजता नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. त्याचवेळी विरोधी पक्षनेते पदावर दावा सांगण्यासाठी काँग्रेसची बैठक होणार आहे. आणि महाराष्ट्राचे प्रभारी एच.के. पाटील बैठकीला उपस्थित राहणार आहेत. शिवाय ठाकरे गटाचीही आज बैठक होणार आहे. तर अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर दोन दिवसांनंतर शरद पवार मुंबईत येणार आहेत. थोडक्यात बदलल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आजचा दिवस बैठकींचा आहे.
Continues below advertisement