BMC Alleged Scam :बीएमसी कथित घोटाळ्याची प्राथमिक चौकशी, पोलिस अधिकाराऱ्यांकडून तपास सुरु :ABP Majha
मुंबई महानगरपालिकेतील कथित घोटाळ्यांबद्दल अतिशय महत्त्वाची बातमी आहे. मुंबई पोलिसांच्या एसआयटीनं तीन कथित घोटाळ्यांची प्राथमिक चौकशी सुरू केली आहे. यामध्ये रस्ते घोटाळा, रस्ते कंत्राटातील गैरप्रकार आणि दहिसर अजमेरा भूखंड घोटाळ्यांचा समावेश आहे. नोव्हेंबर २०१९ ते ऑक्टोबर २०२२ या काळात बीएमसीमध्ये १२ हजार कोटींचे गैरव्यवहार झाले, असा ठपका कॅगनं ठेवला आहे. त्यानुसार राज्य सरकारनं मुंबई पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वात एसआयटीची स्थापना केली. या एसआयटीच्या तपासाला आता वेग आला आहे.