Maharashtra : NCP चा Congress ला आणखी एक धक्का, Parbhani तील Sonpeth नगरपालिका ताब्यात
राष्ट्रवादी काँग्रेसनं मित्रपक्ष काँग्रेसला आणखी एक धक्का दिलाय. बीडच्या आंबेजोगाई नगरपालिकेनंतर आता परभणी जिल्ह्यातली सोनपेठ नगरपालिकाही राष्ट्रवादीनं ताब्यात घेतलीय. सोनपेठच्या नगराध्यक्षा जिजाबाई राठोड यांच्यासह ९ नगरसेवकांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. भाजपचे माजी आमदार राजू तोडसाम हेदेखिल राष्ट्रवादीतल प्रवेश करणार आहेत.