Pravin Darekar on MLC result : विधानपरिषद निवडणुकीत नाना पटोलेंच्या मनमानीचा पराभव : प्रविण दरेकर

Continues below advertisement

मुंबई : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या (Maharashtra Vidhan Parishad) दोन जागांच्या निवडणुकीत भाजपने (BJP) महाविकास आघाडीला (Maha Vikas Aaghadi) धोबीपछाड दिली. नागपूर आणि अकोला या दोन्ही जागांवर भाजपच्या उमेदवारांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला. नागपूरमध्ये भाजप उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसच्या मंगेश देशमुख यांचा पराभव केला. नागपुरात काँग्रेस-महाविकास आघाडीची 16 मते फुटली. भाजप उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांना 362 मते मिळाली. तर, काँग्रेसचे उमेदवार मंगेश देशमुख यांच्या पदरात केवळ 186 मते पडली. त्यामुळे बानवकुळे यांचा 176 मतांनी विजय झाला. 

तिकडे अकोला -वाशिम-बुलढाणा स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधानपरिषदेवर निवडल्या जाणाऱ्या जागेवर शिवसेनेच्या गोपीकिशन बाजोरिया यांना मोठा धक्का बसला. तीनवेळा विजय मिळवलेल्या बाजोरिया यांचा रथ भाजपच्या वसंत खंडेलवाल यांनी रोखला. भाजपच्या वसंत खंडेलवाल यांनी बाजोरिया यांचा जवळपास 109 मतांनी पराभव केला.  तब्बल तीन टर्मपासून आमदार असलेले शिवसेनेचे गोपीकिशन बाजोरियांचा पराभव करत भाजपचे खंडेलवाल  'जायंट किलर' ठरले आहेत. खंडेलवाल यांना 443 मते मिळाली. तर, बाजोरिया यांना 334 मते मिळाली. तर, 31 मते अवैध ठरली. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram