Shaktipeeth Highway | शक्तिपीठ महामार्गामुळे राज्याचे कर्ज वाढणार - वित्त विभागाचा अभिप्राय
शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पासाठी २०,७८७ कोटींच्या आर्थिक दायित्वाचा अभिप्राय वित्त विभागाने दिला. या कर्ज हमीमुळे राज्याच्या तिजोरीवर आर्थिक भार पडेल असे म्हटले आहे. राज्य सरकारवर मार्च २०२६ पर्यंत ९.३२ लाख कोटींचे कर्ज येईल असाही अंदाज वर्तवला आहे. विरोधकांनी या निर्णयाला तीव्र विरोध केला असून, प्रकल्प ठेकेदारांसाठी असल्याचा आरोप केला आहे. मुख्यमंत्र्यांनी राजकारण करणाऱ्यांना इशारा दिला असून, शरद पवार यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.