Cabinet Reshuffle | 'शिंदे' यांचे मंत्र्यांना कडक निर्देश, 'फेरबदला'चे संकेत
मंत्रिमंडळात परफॉर्मन्स नसलेल्या मंत्र्यांना फेरबदलाचे संकेत देण्यात आले आहेत. 'शिंदे' यांनी कामचुकार मंत्र्यांसंदर्भात सूचना दिल्या आहेत. माध्यमांसमोर कमी बोला आणि जास्त काम करा असे निर्देश देण्यात आले. विरोधकांच्या प्रत्येक आरोपाला उत्तर देण्याऐवजी कामातून उत्तर द्या असेही सांगण्यात आले. वादग्रस्त वक्तव्यांमुळे मंत्र्यांचे आणि पक्षाचे नाव खराब होते, यावर लक्ष ठेवण्यास सांगितले. मंत्र्यांना जबाबदारी दिलेल्या जिल्ह्यांमध्ये अपेक्षित निकाल दिसला पाहिजे अशी सूचनाही करण्यात आली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कामाला लागण्याचे आवाहन करण्यात आले. माणिकराव कोकाटे प्रकरण समोर आल्यानंतर माध्यमांसमोर कमी बोलण्याच्या सूचना देण्यात आल्या. यावर 'उद्धव ठाकर' यांनी प्रतिक्रिया दिली. 'गद्दार हा गद्दार असतो त्याच्यामुळे गद्दाराच्या मताला मी काही किंमत देत नाही,' असे 'उद्धव ठाकर' म्हणाले.