BJP Rajya Sabha Election : भाजप राज्यसभेसाठी चौथा उमेदवार देणार, काँग्रेस अडचणीत, समीकरण काय?

Continues below advertisement

Rajya Sabha Election 2024: नवी दिल्ली : भाजप (BJP) राज्यसभेसाठी (Rajya Sabha) आपला चौथा उमेदवार देणार असल्याची माहिती मिळत आहे. अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांचा भाजप प्रवेश आणि भाजपच्या चौथ्या उमेदवारामुळे काँग्रेसची (Maharashtra Congress) राज्यसभेची एक जागा अडचणीत येण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. अनिल बाबर (Anil Babar), गोवर्धन शर्मा (Govardhan Sharma) यांचा मृत्यू आणि अशोक चव्हाण यांचा राजीनामा, तसेच, सुनील केदार (Sunil Kedar) यांची आमदारकी रद्द झाल्यानं सध्या काँग्रेसचं विधानसभेतील एकूण संख्याबळ 284 इतकं आहे. त्यामुळे एकूण आमदार भागीले एकूण उमेदवार अधिक एक यानुसार, 40 मतांचा कोटा होईल. त्यानुसार, भाजपला 3 जागा, शिवसेना (शिंदे गट) 1 जागा, राष्ट्रवादी (अजित दादा गट) 1 जागा आणि काँग्रेसला 1 जागा मिळताना दिसत आहे.   काँग्रेसकडे सध्या 43 आमदार आहेत. अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानं काँग्रेसचं समीकरण बिघडण्याची शक्यता आहे. मात्र, राज्यसभेत भाजप आपला चौथा उमेदवार रिंगणात उतरवणार असल्यानं काँग्रेसचा उमेदवार अडचणीत येण्याची शक्यता आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram