Lumpy skin disease : जनावरांना लम्पीचा विळखा,15 दिवसांत लम्पीने 7 हजारांपेक्षा जास्त जनावरांचा बळी
Continues below advertisement
लम्पीचा प्रादुर्भाव नियंत्रणात आल्याचा दावा सरकारने केला असला तरी, एक धक्कादायक आकडेवारी समोर आलीय. गेल्या १५ दिवसांत लम्पीने सात हजारांपेक्षा जास्त जनावरांचा बळी घेतलाय. ९९.७९ टक्के लसीकरण होऊनही लम्पीचा प्रकोप थांबायचं नाव घेत नसल्याचं दिसतंय. बुलढाणा जिल्ह्यात सर्वाधिक ४ हजार ४६९ जनावरांचा बळी गेलाय. त्यापाठोपाठ अहमदनगर, अमरावती, जळगाव, अकोला, सोलापूर, साताऱयासह संपूर्ण महाराष्ट्रातील जनावरांना लम्पीने विळखा घातलाय. २ डिसेंबरनंतर तब्बल ३ लाख ५६ हजार ९५८ जनावरांना लम्पीची लागण झालीय.
Continues below advertisement