Kolhapur ByElection : कोल्हापुरातील शाहुपुरीत भाजपकडून काँग्रेस कार्यकर्ते पैसे वाटत असल्याचा आरोप
कोल्हापूर उत्तर मतदार संघातल्या पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू झालंय मात्र तरीही इथलं राजकराण थांबण्याचं नाव घेत नाहीये. महाविकास आघाडीनं भाजपवर पैसे वाटप करत असल्यचा आरोप केल्यानंतर आता भाजपनंही काँग्रेस कार्यकर्ते पैसे वाटत असल्याचा आरोप केलाय. कोल्हापूरच्या शाहुपुरी भागात काल रात्री उशीरा पैसे वाटणाऱ्यांना माजी महापौर सुनील कदम यांनी पकडलं, हे कार्यकर्ते सतेज पाटील यांचे असल्याचा सुनील कदम यांचा आरोप आहे.