Kirit Somaiya Viral Video : किरीट सोमय्यांचं देवेंद्र फडणवीसांना पत्र, सोमय्यांविरोधात आंदोलन

भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा व्हिडीओ व्हायरल झालाय. या व्हिडिओमुळे किरीट सोमय्या अडचणीत आलेत. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात या व्हायरल व्हि़डिओवरुन विरोधक आक्रमक झालेत. दरम्यान याप्रकरणी  किरीट सोमय्या यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलंय. आणि व्हायरल व्हिडीओची सत्यता पडताळावी, अशी मागणी केलीय. त्याचवेळी कोणत्याही महिलेवर अत्याचार केला नसल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केलाय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola