Kirit Somaiya : यशवंत जाधव, यामिनी जाधव आणि किशोरी पेडणेकर यांच्यावर किरीट सोमय्यांचा हल्लाबोल
Kirit Somaiya : किरीट सोमय्या यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी म्हटले की, "यशवंत जाधव (Yashwant Jadhav) बेनामी कंपन्यांच्या माध्यमातून खूप मोठे रॅकेट चालवत होते. मी काल महाविकासआघाडीच्या डर्टी डझन नेत्यांची नावे जाहीर केली होती. त्यावेळी मी काही नावं विसरला होतो. यामध्ये आता यशवंत जाधव, यामिनी जाधव आणि किशोरी पेडणेकर यांचा समावेश झाला आहे. किशोरी पेडणेकरांनी एसआरए सदनिका हडप केली असल्याचा आरोप केला आहे.