CSMT ते Karad.... Kirit Somaiya Express प्रवास, Mulund ते कराड कसा होता सोमय्यांचा प्रवास?
किरीट सोमय्या यांना कोल्हापुरात जाण्यापासून पोलिसांनी रोखलं आहे. पोलिसांनी विनंती केल्यानंतर किरीट सोमय्या कराडमध्ये महालक्ष्मी एक्सप्रेसमधून उतरले आहेत. पोलिसांच्याच गाडीतून कराडमधील शासकीय विश्राम गृहात ते पोहोचले आहेत. अशातच कराडमधूनच किरीट सोमय्या पत्रकार परिषद घेणार असून आपली भूमिका ते स्पष्ट करणार आहेत. सकाळी साडेनऊ वाजता ही पत्रकार परिषद पार पडेल. या पत्रकार परिषदेनंतर ते कोणते महत्त्वाचे मुद्दे मांडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या कोल्हापूर दौऱ्याला कोल्हापूर जिल्ह्याधिकाऱ्यांना मज्जाव केला होता. तरिही ते कोल्हापूरला रवाना झाले. किरीट सोमय्या सीएसएमटी रेल्वे स्थानकावर दाखल झाले त्यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त त्याठिकाणी होता. पोलिसांनी त्यांना अडवलं होतं. मात्र सोमय्यांनी पोलिसांना अडवू नका अशी विनंती केली आणि महालक्ष्मी एक्सप्रेसने किरीट सोमय्या कोल्हापूरला रवाना झाले होते. अखेर पोलिसांनी त्यांना कराड रेल्वे स्थानकात रोखलं. रात्रभर हायव्होलटेज ड्रामा पाहायला मिळाला.