Karnataka Assembly Election Result 2023 Live updates : बहुमत मिळाल्यास उद्याच विधीमंडळाची बैठक
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू आहे. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये आघाडी घेतल्यानंतर काँग्रेसने सरकार स्थापनेची तयारी सुरू केली आहे. पक्षाला पुरेसे संख्याबळ मिळाल्यास काँग्रेस विधिमंडळ पक्षाची उद्या रविवारी बैठक होऊ शकते. आमदार आज संध्याकाळपर्यंत राजधानी बंगळूरमध्ये पोहोचू शकतात. दरम्यान, कर्नाटकची उपराजधानी आणि सीमावासियांचा आत्मा असलेल्या बेळगावमध्ये काँग्रेसने 18 पैकी 11 जागांवर आघाडी घेतली आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीची पूर्णत: निराशा होताना दिसत आहे. बेळगाव दक्षिण आणि खानापूर या दोन मतदारसंघात महाराष्ट्र एकीकरण समितीची चुरशीने लढत सुरु आहे. निपाणी मतदारसंघातही काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये चुरशीची लढत सुरु आहे. सुरुवातींच्या कलामध्ये राष्ट्रवादीचे उत्तम पाटील आघाडीवर होते. मात्र, आता ते पिछाडीवर असून भाजपच्या शशिकला जोल्ले यांनी आघाडी घेतली. मात्र, आता पुन्हा आघाडी बदलून उत्तम पाटील 1582 मतांनी आघाडीवर होते. आता पुन्हा चित्र पलटले असून केवळ 259 मतांनी