Karnataka Assembly Election 2023 : भाजप पिछाडीवर, काँग्रेसची आघाडी कायम
कर्नाटक विधानसभेचे (Karnataka Assembly Election Result) कल हाती येत आहेत. सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेसनं (Congress) जोरदार मुसंडी मारल्याचं चित्र दिसत आहे. बहुतमाचा आकडा पार करुन काँग्रेस 135 जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजप 70 जागांवर आघाडीवर आहे. काही ठिकाणी मात्र, भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये काँटे की टक्कर असल्याचं पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे बेळगावमध्येही काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत.