CAB I आजचा दिवस हा 'काळा दिवस', नागरिकत्व सुधारणा विधेयकावर सोनिया गांधींची टीका I एबीपी माझा
Continues below advertisement
नागरिकत्व सुधारणा विधेयक राज्यसभेत मंजूर झाले आहे. या दिवसाला काळा दिवस, अशी टीका काँग्रेस नेते सोनिया गांधी यांनी केली आहे. तर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी भाजप देशाचे भवितव्य उद्ध्वस्त करत आहे. कोणताही धर्म नागरिकत्त्व मिळण्याचा आधार नसावा. दुसऱ्या देशातील नागरिकांवर अत्याचार झालाय, हे सरकारला कसे समजणार. भाजप संविधानाची तोडमोड करत आहे. या विधेयकाद्वारे नाव न घेता एखाद्या धर्माला लक्ष्य केले जात आहे, असा आरोप सिब्बल यांनी भाजपवर केला.
Continues below advertisement