Explainer | संशोधनातून बदलला आहे कापसाचा रंग | ABP Majha

Continues below advertisement
कापसाच्या हंगामातला परवलीचा शब्द म्हणजे 'पांढरं सोनं'... मात्र, कापुस ही आपली रंगानं झालेली प्रचलित ओळख पुसू पाहतोय. कापड निर्मितीत महत्वाचा घटक कापुस. पांढऱ्या कापसावर विविध रासायनिक प्रक्रिया करून वेगवेगळ्या रंगांच्या कापडाची निर्मिती केली जातेय. आता मात्र  नैसर्गिकरित्या रंगीत कापुसच आपल्याला पहायला मिळणार आहेय. सध्या अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर खाकी रंगाच्या कापसाची लागवड करण्यात आलीय. कापसाची ही जात नागपुरच्या कापुस संशोधन संस्थेतील शास्त्रज्ञ डॉ. विनिता गोतमारे यांनी विकसित केलीये. रायमंडी आणि थरबेरी या रानटी कापसाच्या संकरातून या जातीची निर्मिती करण्यात आलीये.
 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram