20 लाख कोटी महाराष्ट्राला मिळाले का?विस्मरणाचा रोग मला झालाय की तुम्हाला? आव्हाडांचा फडणवीसांना टोला
फडणवीसांच्या टीकेला उत्तर देताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, पहिली लाट आली त्यावेळेस व्हेंटिलेटर, साधनसामग्री बंद केली आणि वीस लाख कोटी म्हणत फिरत आहेत. विस्मरणाचा रोग मला झालाय की तुम्हाला झालाय? असा सवाल त्यांनी केला. 20 लाख कोटींचा नक्की हिशोब समोर ठेवा मग दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल, असंही ते म्हणाले. कोण विरोधकांना दाबत आहे? कोरोना दाबायचा की विरोधकांना? लोक मरणाशी लढत आहेत त्यांना सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी सरकारची आहे. सरकारसोबत काम करायच्या ऐवजी सरकारच्या पायात पाय घालून पाडण्याचा विचार विरोधक करत असतील तर अर्थ नाही, असं आव्हाड म्हणाले. राज्य सरकारला एक लाख कोटी रुपयांची तूट आली आहे. महाराष्ट्र पहिल्यांदाच शून्यावर गेला आहे तो केंद्रामुळे गेलाय. वीस लाख कोटी मधील किती कोटी महाराष्ट्राच्या हातात आले हे जर देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं तर मला विस्मरण झालं असेल तर माझ्या स्मरणात भर होईल, असंही ते म्हणाले.