Jitendra Awhad :काळाराम मंदिरातील महंतांविरोधात संयोगिताराजे छत्रपती आक्रमक, जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया

नाशिकच्या काळाराम मंदिरातील महंतांविरोधात संयोगिता राजे छत्रपती या चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत.. सध्या त्यांची इन्स्ट्ग्राम पोस्ट चांगलीच व्हायरल झालीय. या पोस्टमध्ये स्वतःला सर्वज्ञ समजून, माणसा-माणसात भेद निर्माण करणाऱ्या, आणि परमेश्वराच्या नावाने केवळ स्वार्थ साधू पाहणाऱ्यांना सद्बुद्धि दे अशा आशयाची पोस्ट लिहून त्यांनी इन्स्टाग्रामवर टाकलीय. नाशिकच्या काळाराम मंदिरातील तथाकथित महंतांनी माझ्या पूजेसाठी पुराणातील मंत्र म्हणण्याचा प्रयत्न केला. कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याच्या वारशामुळे मी ठामपणे विरोध केला. अशी प्रतिक्रीया त्यांनी दिलीय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola