Solapur ZP School Sealed : कर न भरल्यान शाळेला सील, व्हरांड्यात भरवावा लागला वर्ग
Solapur ZP School Sealed : कर न भरल्यान शाळेला सील, व्हरांड्यात भरवावा लागला वर्ग
थकीत कर न भरल्याने सोलापुरात जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा सील करण्यात आली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या शिक्षकांनी बंद शाळेच्या व्हरंड्यात वर्ग भरवले. सोलापुरातल्या मैंदर्गी नगर परिषदेच्या हद्दीत जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. या शाळेची जवळपास दहा लाख 82 हजार रुपये कर थकबाकी आहे. त्यामुळे मैंदर्गी नगर परिषदेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी काल हि शाळा सील केली. जिल्हा परिषदेच्या शाळेचे कर भरण्याची जबाबदारी हे जिल्हा परिषदेची असते.