Anant Karmuse Case : अनंत करमुसे मारहाण प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणी वाढणार
राष्ट्रवादीच्या २ नेत्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे... माजी मंत्री जितेंद्र आव्हाड आणि भाजपतून राष्ट्रवादीत आलेल्या एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे... अनंत करमुसे मारहाण प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणी वाढू शकतात कारण आता सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आलीय... याप्रकरणी २५ नोेव्हेंबरला सुनावणी होणारेय... सीबीआय चौकशी करण्याची मागणी करमुसे यांनी या याचिकेतून केलीय... तर दुसरीकडे भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणात पुन्हा चौकशी करण्याचे न्यायालयानं आदेश दिल्याचा दावा याचिकाकर्ते हेमंत गावंडे यांनी दिलीय... त्यामुळे आता याप्रकरणात खडसेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे...