Jayant Patil | गृहखातं कोणाकडे जाणार हे मंत्रिमंडळ विस्तारानंतर कळेल : जयंत पाटील | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार उद्या पार पडणार आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर तयारीही जोरदार सुरु आहे. मात्र उद्या मंत्रिमंडळ विस्तारात गृहखातं कोणाकडे जाणार याची उत्सुकता सर्वांना आहे. अर्थमंत्री जयंत पाटील यांनीही या प्रश्नाचं गुढ कायम ठेवलं आहे. मंत्रिमंडळ विस्तारबाबत राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थिती पार पडली. त्यानंतर बोलताना अर्थमंत्री जयंत पाटील यांनी गृहखात्याबद्दची उत्सुकता कायम ठेवली आहे. “गृहखातं कोणाकडे जाणार हे मंत्रिमंडळ विस्तारानंतरच कळेल” अस वक्तव्य जयंत पाटील यांनी केलं आहे.