अटकनाट्यानंतर Narayan Rane यांचा Jan Ashirwad यात्रेचा रथ आज कोकणात! : ABP Majha

Continues below advertisement

शिवसेना विरुद्ध नारायण राणे या संघर्षाचा दुसरा भाग पुन्हा सुरु होण्याची शक्यता आहे. कारण नारायण राणे आजपासून जन आशीर्वाद यात्रेचा तिसरा टप्पा सुरु करणार आहेत. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन दिवसाची ही यात्रा असेल.

नारायण राणे यांच्या अटक आणि सुटकेनंतर जन आशीर्वाद यात्रेचा तिसरा भाग सुरु ठेवण्याचा निर्धार भाजपा आणि नारायण राणे यांनी केला आहे. त्यामुळे कोकणात खास करून नारायण राणे यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या सिंधुदुर्गात शिवसेना विरुद्ध राणे हा संघर्ष तीव्र होऊ शकतो.

दरम्यान, नारायण राणे यांच्या अटक नाट्यानंतर थांबलेली जन आशीर्वीद यात्रा आज कोकणात पुन्हा सुरू होणार आहे. राणे रत्नागिरीतून या यात्रेला सुरूवात करणार असून संध्याकाळ नंतर त्यांच्या होम पीचवर अर्थात सिंधुदुर्गमध्ये जाणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram