Graduate Constituency Election | अपक्ष उमेदवार अभिजीत बिचुकले यांचं नाव मतदार यादीतून गायब, मतदान केंद्रावर गोंधळ
सातारा: राज्यातील विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान होतंय. त्यामध्ये प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. पुणे पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष उमेद्वार अभिजीत बिचुकले यांचं नाव मतदार यादीतून गायब झालं. प्रशासनाच्या या भोंगळ कारभाराविरोधात अभिजीत बिचुकले यांनी संताप व्यक्त केलाय.