उर्मिला मातोंडकर यांचं शिवसेनेत स्वागत, महाराष्ट्रासाठी चांगलं काम करण्याच्या शुभेच्छा -आदित्य ठाकरे
मुंबई : अभिनेत्री उर्मिला मातोंडकर अखेर शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांच्या 'मातोश्री' या निवासस्थानी रश्मी ठाकरे यांनी उर्मिला मातोंडकर यांनी हातावर शिवबंधन बांधलं. मी शिवसैनिक म्हणून आली आहे आणि शिवसैनिक म्हणून काम करणार आहे. काम करण्याची इच्छा असल्याने कोणत्याही अपेक्षाविना शिवसेनेत प्रवेश केला आहे, अशी प्रतिक्रिया अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी व्यक्त केली. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
Tags :
Soft Pornstar Urmila Matondkar Interview SSR Death Case SSR Urmila Matondkar Kangna Ranaut Majha Katta Rhea Chakraborty Kangana Ranaut Shivsena