BRSकडून राज्यातील आमदार,खासदारांच्या भेटीगाठीत वाढ,5 फेब्रुवारीला K.ChandrasekharRao यांची जाहीर सभा

Continues below advertisement

भारत राष्ट्र समिती BRS पक्षाचे अध्यक्ष व तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी आपल्या पक्षाचे महाराष्ट्रातील आगमन हे जंगी करण्यासाठी आणि तेलंगणा प्रमाणे BRS पक्षाची ताकत व शक्ती प्रदर्शन महाराष्ट्रात दाखवण्यासाठी तयारी सुरू केली आहे. दरम्यान येत्या 5 फेब्रुवारी रोजी नांदेड येथे के चंद्रशेखर राव यांची सभा तेवढीच भव्यदिव्य करण्यासाठी महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात आमदार खासदारांच्या भेटीगाठी वाढवल्या आहेत. तर महाराष्ट्रात आपल्या पक्षाच्या आगमनाची पहिली सभा भव्य व यशस्वी करण्यासाठी गेल्या आठ दिवसांपासून BRS पक्षाचे आमदार,खासदार माजी मंत्री नांदेडात ठाण मांडून बसले आहेत. तर आज मोठ्या प्रमाणात BRS पक्षाचे मंत्री, आमदार,खासदार नांदेड मध्ये दाखल झाले आहेत. सदर मंत्री आमदार महाराष्ट्रात आपली ताकत वाढवण्यासाठी येथील तेलगू भाषिक राजकीय नेते, माजी मंत्री, नगराध्यक्ष, नगरसेवक, महापौर यांच्या उद्या भेटीगाठी करून सभेच्या दिवशी त्यांचा BRS पक्षात प्रवेश करणार आहेत.तर आज BRS पक्षाच्या मंत्री,खासदार,आमदार यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय माजी मंत्री ,भास्करराव पाटील खतगावकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram