Chandrakant Patil : शाईफेकीच्या घटनेनंतर चंद्रकांत पाटील यांच्या सुरक्षेत प्रचंड वाढ

पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेल्या शाईफेकीच्या घटनेनंतर त्यांच्या सुरक्षेत प्रचंड वाढ करण्यात आली आहे. चंद्रकांत पाटील जिथे जिथे जात आहेत त्या ठिकाणी स्थानिक पोलीस स्टेशनच्या पोलिसांबरोबर क्राईम ब्रांचचे पाच पोलीस अधिकारी तैनात करण्यात येत आहेत. चंद्रकांत पाटील यांची गाडी ज्या रस्त्यावरून जाणार आहे त्या रस्त्यावर वाहतूक पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात येत आहे. राज्य पोलिसांच्या या सुरक्षेबरोबरच चंद्रकांत पाटील यांना सीआयएसएफ या केंद्रीय सुरक्षा दलाची देखील सुरक्षा आहे.  चंद्रकांत पाटील आज पुण्यातील कर्वेनगर भागातील एका संस्थेला भेट देण्यासाठी येणार आहेत. 

 

 


 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola