Devendra Fadnavis Pune | कोरोना परिस्थितीत राज्य सरकारचं पुण्याकडे दुर्लक्ष झालंय - देवेंद्र फडणवीस
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुणे : कोरोनाच्या परिस्थितीत पुण्याकडे दुर्लक्ष झाले असल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस आज पुणे शहरातील दौऱ्यावर असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यांनी या शहराच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. आवश्यक इतक्या चाचण्या पुण्यात झाल्या नसून कोरोना चाचण्या वाढवण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी म्हटलं.
महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे, त्यासाठी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. कोरोनाशी सामना करण्यासाठी मोठ्या प्रमाणात व्यवस्था उभी करावी लागणार आहे. पावसाळा लागल्याने रुग्णसंख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी महापालिकेकडून तयारी केली जात आहे.