Imtiyaz Jaleel : इम्तियाज जलील यांच्याकडून Congress आणि राष्ट्रवादीला आघाडीसाठी ऑफर : ABP Majha
एकीकडे भाजप महाविकास आघाडीला खिंडार पाडण्याची भाषा करतंय.. तर दुसरीकडे ओवेसींच्या एमआयएमनं महाविकास आघाडीशी हातमिळवणी करण्याची तयारी दाखवलीय... औरंगाबादचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी हा निरोप शरद पवारांपर्यंत पोहोचवण्याची विनंती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंना केली आहे. शिवसेनेच्या कट्टर हिंदुत्ववादाचा मुद्दा जलील यांच्यासमोर उपस्थित करण्यात आला असता, भाजपला हरवण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं मत जलील यांनी व्यक्त केलं. आता एमआयएमची ही ऑफर महाविकास आघाडी स्वीकारणार का? विशेषतः शिवसेना काय भूमिका घेणार याकडे राजकीय पंडितांचं लक्ष असणार आहे,...