Dadar : Dadasaheb Rege यांच्या जयंतीनिमित्त बालमोहनच्या माजी विद्यार्थ्यांचा आज मेळावा : ABP Majha
दिवंगत शिक्षणमहर्षी आणि मुंबईतल्या दादर येथील बालमोहन विद्यामंदिरचे संस्थापक दादासाहेब रेगे यांची आज जयंती आहे. दादांचा १९ मार्च हा जन्मदिन यापुढच्या काळात बालमोहन विद्यामंदिर विद्यार्थी आंतरराष्ट्रीय दिन म्हणून साजरा करण्याची कल्पना या शाळेतल्या 1972 सालच्या माजी विद्यार्थ्यांनी मांडली आहे. त्यानिमित्त आज सायंकाळी सहा वाजता दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात एका मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या मेळाव्यात बालमोहन विद्यामंदिर विद्यार्थी आंतरराष्ट्रीय दिनाच्या कल्पनेला मूर्त स्वरुप देण्यात येणार आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि भारताचे माजी क्रिकेटर संदीप पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. जयंत पाटील आणि संदीप पाटील हे दोघंही बालमोहनचे माजी विद्यार्थी आहेत.