Rajan Salvi : मी मरेपर्यंत तुरुंगात राहीन पण कुठेही जाणार नाही - राजन साळवी
ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्यानंतर आता राजापूरमधील ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांनांही एसीबीने नोटीस बजावलीये. उद्या अलिबागमधील अँटी करप्शन कार्यालयात त्यांची चौकशी केली जाणार आहे.. दरम्यान यावर
मी निष्ठावंत राहिलो म्हणून मला एसीबीने नोटीस बजावली असा आरोप राजन साळवींनी केलाय तसंच मी मरेपर्यंत तुरुंगात राहीन पण कुठेही जाणार नाही असंही ते म्हणाले..