Raj Thackeray on Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे मला टीव्हीवर दिसले, कारभार दिसलाच नाही - राज ठाकरे
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
31 Jul 2020 10:39 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
"मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मला टीव्हीवर दिसले, कारभार दिसलाच नाही. त्याबद्दल काही बोलणार नाही," असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं. एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन कार्यक्रमात राज ठाकरे बोलत होते. कोरोना संकटात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कारभाराचं, कामाचं सर्वत्र कौतुक होत आहे. याविषयी विचारलेल्या प्रश्नावर राज ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं. तसंच हे सरकार फार काळ टिकेल असं वाटत नाही, असंही राज ठाकरे म्हणाले. जिथे एकोपा नाही, एकमत नाही ते जास्त काळ टिकेल, असं वाटत नाही, असं त्यांनी सांगितलं.