Majha Maharashtra Majha Vision | केंद्र सरकारने लागू केलेल्या पहिल्या लॉकडाऊनमुळे कोरोनाचा प्रसार वाढला - जयंत पाटील
देशात आणि राज्यात कोरोनाचा फैलाव वेगाने होत आहे. रुग्णसंख्ये दिवसेदिवेस वाढ होताना दिसत आहे. या परिस्थितीला केंद्र सरकारने जाहीर केलेलं पहिलं लॉकडाऊन जबाबदार असल्याचा आरोप राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी म्हटलं. एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्र सरकारने पहिला लॉकडाऊन लागू करताना कुणालाही विश्वासात घेतलं नाही. पहिला लॉकडाऊन लागू करण्याआधी काही दिवसांची मुदत देणे आवश्यक होते. जेणेकरुन सर्व व्यवस्था उभारण्यास राज्य सरकारला वेळ मिळाला असता.
स्थलांतरितांचे हाल झाले नसते आणि कोरोनाचा संसर्ग न घेता लोक आपआपल्या निश्चित स्थळी पोहोचले असते. मात्र नोटबंदीप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अचानक देशात लॉकडाऊन जाहीर केला. मात्र परिस्थिती बिघडल्यानंतर मुंबई, पुण्यातील किंवा शहरी भागातून लोक पायी किंवा मिळेल त्या मार्गाने आपआपल्या गावी पोहोचले आणि सोबत कोरोनाही घेऊन गेले, त्यामुळे ग्रामीण भागात आज परिस्थिती बिघडत असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं.