Sharjeel Usmani Controversy | शरजील उस्मानीवरून राजकारण तापलं, भाजपचा ठाकरे सरकारवर निशाणा

Continues below advertisement
मुंबई : पुण्यातील एल्गार परिषदेत विद्यार्थी नेता म्हणून चर्चेत असलेल्या शार्जील उस्मानी याने हिंदू समाजाबद्दल केलेले अवमानजनक, आक्षेपार्ह, गंभीर वक्तव्य आणि त्याच्यावर राज्य सरकारतर्फे तातडीने आणि कठोरातील कठोर कारवाई करण्याची मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. यानंतर 'सामना' वृत्तपत्राच्या अग्रलेखातून फडणवीसांना उत्तर देण्यात आलं आहे. शर्जिलला बेड्या पडतीलच. निश्चिंत रहा! असं आश्वस्त करताना ठाकरे राज्यात हिंदूच काय, समाजातला प्रत्येक घटक सुरक्षित आहे. पण रस्त्यावर तीन महिन्यांपासून लढणाऱ्या हिंदू शेतकऱ्यांना तेवढा आधार द्या म्हणजे झाले, असा टोला लगावला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram