Danve Vs Jadhav | रावसाहेब दानवे यांच्या सांगण्यावरुन मुलावर अॅट्रॉसिटी; हर्षवर्धन जाधवांच्या आईचा आरोप
मनसे जिल्हाध्यक्ष हर्षवर्धन जाधव यांच्यावर त्यांचे सासरे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनीच अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करायला लावला, असा आरोप हर्षवर्धन जाधव यांच्या आई तेजस्विनी जाधव यांनी केला आहे. सोबतच त्यांची सून संजना हिच्या विरोधातही क्रांतीचौक पोलीस ठाण्यात छळाची तक्रार देण्यात आली आहे. सोमवारी (9 मार्च)अॅट्रॉसिटी प्रकरणात कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला. एका पानटपरी चालकाला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. त्यामुळे हर्षवर्धन जाधव यांना अटक होण्याची शक्यता आहे.
Tags :
Atrocity On Harshvardhan Jadhav Tejaswini Jadhav Harshvardhan Jadhav Controversy Atrocity Case Harshvardhan Jadhav Raosaheb Danve मराठी बातम्या