Guardian Minister : पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी मुख्यमंत्री शिंदेंकडून जाहीर : ABP Majha
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर केलीय..२१ जिल्ह्याचं पालकमंत्री भाजपचे तर शिंदे गटाकडे १५ जिल्ह्यांचं पालकत्व आहे.. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विदर्भातील सहा जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद सोपवण्यात आलंय. तर मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे मुंबई शहराच्या पालकमंत्रीपदाची धुरा सोपवण्यात आलीय. भाजपचे मंगलप्रभात लोढा मुंबई उपनगरचे पालकमंत्री असणार आहेत. शिंदे गटातील शंभूराज देसाई पालकमंत्री म्हणून ठाण्याची जबाबदारी सांभाळणार आहेत. तर आमदार रवींद्र चव्हाण पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत.