ABP News

Govinda प्रचारासाठी मवाळमध्ये आला पण चक्क Shrirang Barne याचं नावचं विसरला : ABP Majha

Continues below advertisement

तो आला, त्याने पाहिलं अन त्याने जिंकलं ही. पण तो कोणासाठी आला हेच विसरला. हे घडलं ते सुपरस्टार गोविंदासोबत. महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणेंच्या रोड शोसाठी गोविंदा रविवारी मावळ मतदारसंघात आला होता. त्यावेळी पत्रकार परिषदेत गोविंदा उपस्थितांची नावं घेऊ लागला. पण ज्यांच्या रोड शोसाठी तो आला, त्या श्रीरंग बारणेंचं नाव शेजारी बसलेल्या भाजपच्या आमदार उमा खापरेंना कानात सांगावं लागलं. हे सगळं माध्यमांच्या कॅमेरात कैद झालं. आता उमेदवाराचे नाव लक्षात नसेल तर गोविंदाला बोलावून काय साध्य झालं? असा प्रश्न गोविंदाच्या उजव्या बाजूला बसलेल्या बारणेंना नक्कीच पडला असेल. त्यांच्या चेहऱ्यावर तसाच काहीसा प्रश्न निर्माण झाल्याचंही दिसून येत होतं. स्टार प्रचारक म्हणून शिंदेंची शिवसेना गोविंदाचे राज्यभर दौरे लावत आहे. पण सेलिब्रिटी असणाऱ्या गोविंदाला राजकारणात किती रस आहे, हे मात्र त्याच्या कृतीतून दिसून आलं.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram