Gopinath Munde Birth Anniversary : गोपीनाथ मुंडेंनी दु:ख विसरुन लढायला शिकवलं, पंकजा मुंडे गहिवरल्या
Continues below advertisement
Pankaja Munde: भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती असून, पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावर त्यांचे दर्शन घेतले. तसेच अर्धा तास त्यांनी मौन बाळगत गोपीनाथ मुंडे यांची जयंती वेगळ्या पद्धतीनं साजरी केली. त्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधानाच्या मुद्यावर आपलं मत व्यक्त केले. तर महापुरुषांबद्दल वाईट बोलण्याचे समर्थन करणार नाही, असे त्यांनी आपल्या भाषणातून स्पष्ट केले.
Continues below advertisement