Gajanan Kirtikar शिंदे गटात जाणार?,शिवसेनेला आणखी एक हादरा बसणार : ABP Majha

शिवसेनेला आणखी एक हादरा बसण्याची शक्यता आहे.... शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि खासदार गजानन कीर्तिकर यांनी काल वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गणपतीचं दर्शन घेतल्याची माहिती मिळतेय.... यावेळी राजकीय चर्चा झाल्याची माहिती कळतेय. या भेटीनंतर कीर्तिकर हेदेखिल शिंदे गटात सामील होण्याची शक्यता आहे. गजानन कीर्तिकर शिंदे गटात गेल्यास शिवसेनेला दुहेरी धक्का बसण्याची शक्यता आहे. गजानन कीर्तिकर शिवसेनेच्या स्थानीय लोकाधिकार समितीचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे कीर्तिकर शिंदेंबरोबर गेल्यास शिवसेनेची महत्त्वाची संघटना असलेली स्थानिय लोकाधिकार समितीदेखील शिंदे गटाबरोबर जाऊ शकते आणि त्याचा फायदा शिंदे गटाला होऊ शकतो. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola