Konkan Rain : आंबा आणि द्राक्ष बागायतदारांसह शेतकऱ्यांची चिंता वाढली, शेतकऱ्यासमोर नवं संकट
Continues below advertisement
रत्नागिरीत अवकाळी पावसामुळे आंब्याच्या पिकावर परिणाम होणार आहे. अचानक झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यासमोर नवं संकट उभं राहिलं आहे. पुढील दोन दिवसांत रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांसह विदर्भातल्या काही भागांतही पावसाची शक्यता आहे.. वातावरणातल्या या बदलामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांसमोर नवं संकट उभं ठाकलंय.. सांगली, पंढरपूरमध्ये द्राक्ष आणि डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्याही चिंता वाढली आहे.
Continues below advertisement