Shikhar Bank Scam : शिखर बँक प्रकरणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अडचणीत पुन्हा वाढ होणार?
Continues below advertisement
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील हजारो कोटी रुपयांचा घोटाळा केल्याच्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. याप्रकरणी अजित पवारांसह एकूण ७५ जणांना दोन वर्षांपूर्वी 'क्लीन चीट' देण्यात आली होती. मुंबई पोलीसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी दाखल केलेला सी-समरी रिपोर्ट आधी रद्द करा, मगच नव्यानं तपास सुरू करा अशी मागणी याप्रकरणातील तक्रारदारांनी कोर्टाकडे केली आहे. तक्रारदार माणिकराव जाधव यांच्यावतीनं तसा रितसर अर्जच कोर्टात सादर करण्यात आला असून शालिनीताई पाटील, जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यावतीनंही आज कोर्टात तसे अर्ज करण्यात येणार आहेत.
Continues below advertisement