ABP News

Election Commission PC :  EVM आणि पंडीलकर यांचा काहीही संबंध नाही- निर्णय अधिकारी

Continues below advertisement

मुंबई : लोकसभा निवडणुकीत केवळ 48 मतांनी विजयी झालेल्या रवींद्र वायकर यांच्या मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघात ईव्हीएमध्ये (EVM) घोळ झाल्याचा आरोप विरोधी पक्षातील काही नेत्यांनी केला आहे. तसेच, अमोल कीर्तीकर (Amol Kirtikar) यांच्याकडून यासंदर्भात अर्ज दाखल करण्यात आला आहे. मात्र, दोन दिवसांपूर्वी या प्रकरणात रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांच्या मेव्हण्याची एंट्री झाल्याने आणखी गोंधळ निर्माण झाला आहे. ईव्हीएम अनलॉक करणारा मोबाईल हा रवींद्र वायकर यांच्या मेव्हण्याच्या हाती असल्याची धक्कादायक माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. त्यानंतर, विरोधी पक्षातील नेत्यांनी ईव्हीएमच्या वापरावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. त्यामुळे, अमोल कीर्तीकर विरुद्ध रवींद्र वायकर यांच्यातील लढत पुन्हा एकदा चर्चेत आली. त्यावर, आता निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिलं आहे. ईव्हीएम हे स्वतंत्र डिव्हाईस असून त्याला कुठलीही मोबाईल कनेक्टीव्हीटी नसल्याचं निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी स्पष्ट केलं आहे. 

मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर अवघ्या 48 मतांनी विजयी झाल्यानंतर सुरू असलेला वाद अजूनही कायम आहे. आता या प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती समोर आली. या प्रकरणात वनराई  पोलिसांकडून निवडणूक मतमोजणी प्रक्रियेतील डेटा ऑफरेटरकडून तपास सुरु आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. तर, आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. त्यातच, ट्विटरचे प्रमुख आणि टेस्ला कंपनीचे मालक एलन मस्क यांनीही ट्विट करुन ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केला. त्यामुळे, राजकीय नेत्यांनी पुन्हा एकदा उत्तर-पश्चिम मतदारसंघातील विजयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. त्यानंतर, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram