BMC Election : मुंबई महापालिकेचा निवडणूक रणसंग्राम जानेवारीत? निवडणूका का रखडल्या?
abp majha web team
Updated at:
26 Oct 2022 08:57 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई महापालिकेची बहुप्रतीक्षित निवडणूक जानेवारीत होईल, असे स्पष्ट संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेयत. काल दिवाळीनिमित्त पत्रकारांशी गप्पा मारताना मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र काहीशी सावध प्रतिक्रिया दिलीय. निवडणूक कधी घ्यायची हे कोर्ट आणि निवडणूक आयोग ठरवेल, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.