Maharashtra Gram Panchayat Election 2022: राज्यात 7हजार 682 ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीचा रणसंग्राम
Continues below advertisement
Maharashtra Gram Panchayat Election 2022 : राज्यातील 7 हजार 682 ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीचा रणसंग्राम सुरु असून, प्रचाराचा धुरळा उडलाय. 18 डिसेंबरला मतदान, तर 20 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. माळशिरस तालुक्यातील वेळापूर हि सर्वात मोठी ग्रामपंचायत असून येथे राष्ट्रवादीचे उत्तमराव जानकर यांची सत्ता आहे . याच ग्रामपंचायत मधून सरपंचपदासाठी जनतेचा उमेदवार म्हणून तृतियपंथीय माया उर्फ सदाशिव रामचंद्र अडसूळ हे निवडणूक रिंगणात उतरल्याने रंगतदार प्रचार सुरु असून माया याने आपला जाहीरनामा 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर करून जनतेत मते मागत फिरत आहे . या ठिकाणी राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी काट्याची टक्कर सुरु असताना मायाच्या उमेदवारीने वेळापूर सरपंचपदासाठी चुरस वाढल्याचे चित्र आहे .
Continues below advertisement