Eknath Shinde vs Uddhav Thackeray : उद्यापासून केंद्रीय निवडणूक आयोगात शिंदें आणि ठाकरे गटात सामना

खरी शिवसेना कुणाची यावरुन उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटात सुरु असलेल्या राजकीय नाट्याचा दुसरा अंक उद्यापासून केंद्रीय निवडणूक आयोगात रंगणार आहे.. शिवसेना उद्या पहिली मागणी स्थगितीचीच करणार असल्याचं समजतंय... सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु असताना आयोगाने निर्णयाची घाई करु नये अशी विनंती शिवसेना करणार आहे.. शिंदे गटाला आयोगाकडे धाव घेण्याचा हक्क नाही अशी ठाकरे गटाची भूमिका आहे.. जे लोक आयोगासमोर आलेत त्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे. त्यामुळे त्यांना आयोगाकडे दावा करण्याचा हक्कच नसल्याचा शिवसेनेचा युक्तीवाद आहे. दोन्ही बाजूंना आपापली बाजू मांडण्यासाठी 8 ऑगस्टपर्यंतची मुदत दिली होती. सर्वोच्च न्यायालयाने आयोगाच्या कार्यवाहीला थेट स्थगिती दिलेली नाही.. त्यामुळे आयोगाच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola