Bangladesh Financial Crisis : श्रीलंकेनंतर आता बांगलादेश आर्थिक संकटात, इंधन दरात 50 टक्क्यांची वाढ

Continues below advertisement

Bangladesh Petrol-Diesel : आधी श्रीलंका (Sri Lanka), नंतर पाकिस्तान (Pakistan) आणि आता बांग्लादेश... (Bangladesh) संपूर्ण जगभरातच महागाईनं कळस गाठला असून मंदीचे काळे ढग दाटले आहेत. श्रीलंकेपाठोपाठ बांगलादेशही आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावर आहे. बांगलादेशात याचाचा पहिला परिणाम वाढत्या इंधन दराच्या रुपात पाहायला मिळाला आहे. बांगलादेशमध्ये इंधनाच्या दरात रातोरात 50 टक्क्यांची वाढ झाली आहे. बांगलादेशच्या इतिहासात आतापर्यंतची ही सर्वाधिक इंधन दरवाढ मानली जात आहे. रात्रीपासूनच पेट्रोल पंपावर रांगाच रांगा पाहायला मिळत आहेत. गेल्या आठ वर्षांतील सर्वाधिक महागाईची कळ सोसणाऱ्या बांगलादेशच्या नागरिकांमध्ये इंधन दरवाढीमुळे संतापाचं वातावरण पाहायला मिळत आहे. 

श्रीलंकेतील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशची जनताही सरकारविरोधात रस्त्यावर उतरली आहे. ठिकठिकाणी नागरिकांकडून जाळपोळ आणि आंदोलनं करण्यात येत आहेत. त्यातच बांगलादेश आयएमएफ अर्थात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या कर्जात बुडाला आहे. बांगलादेशवर आयएमएफच्या 762 मिलियन डॉलरच्या कर्जाचा डोंगर आहे. शिवाय गेल्या तीन वर्षात बांगलादेशात विजेचं संकटही गहिरं झालं आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram