Eknath khadse Exclusive : एकनाथ खडसे यांचं अमित शाह यांच्याशी काय बोलणं झालं ? : ABP Majha
मी राष्ट्रवादीतच राहणार असल्याचं म्हणत एकनाथ खडसेंनी भाजपमध्ये परतण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिलाय. ते बुलढाण्यात एबीपी माझाशी बोलत होते..तर शरद पवारांसोबतच अमित शाहांना भेटणार असल्याचं देखील खडसेंनी स्पष्ट केलंय. फोनवरुन शाहांशी चर्चा केल्यानंतर खडसे भाजपात परतणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं.