Shrikant Shinde : डॉ. श्रीकांत शिंदे यांची थेट उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला आव्हान देण्याची तयारी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी थेट उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला आव्हान देण्याची तयारी सुरू केलीय. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं श्रीकांत शिंदे सक्रिय झाले असून, ते मुंबईतल्या शाखांना भेट देऊन ठाकरे आणि त्यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेच्या धोरणांवर टीका करण्याची संधी सोडत नाहीयत. याच अभियानाअंतर्गत ते उद्या प्रभादेवी आणि दादरमधल्या शिंदेंच्या शिवसेनेच्या शाखांना भेट देणार आहेत. 'सामना'च्या दारात असलेल्या शिवसेना शाखेला श्रीकांत शिंदे भेट देणार असून, त्यामुळं शिंदे विरुद्ध ठाकरे या संघर्षाला धार येणार असल्याचं चित्र आहे.