Dhairyasheel Mohite Patil Full Speech : धैर्यशील मोहितेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppDhairyashil Mohite Patil, Akluj : "एका माणसाला मला उत्तर द्यायचं आहे. आपण त्याला इथून निवडून दिला. त्याने मांडव्यात एक प्रश्न विचारला. म्हणाला 70 -75 वर्षात जेवढा विकास झाला, तो मी पाच वर्षात केला. मी फक्त त्याला उत्तर देतो. दादांच्या सांगण्यावरुन लोकांनी एका रात्रीत तुला आमदार केला. आता तुझं पार्सल एका रात्रीत माघारी बीडला पाठवायचय. तुम्ही आमच्या कुटुंबावर तीन पिढ्या प्रेम करत आहात. सहकार महर्षी आणि विजयदादांच्या विचारांना तडा जाऊ देणार नाही, एवढा शब्द मी देतो",अशी टीका धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोलापूर लोकसभेचे उमेदवार राम सातपुते यांच्यावर केली. अकलूजमध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil), माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटीलही उपस्थित होते.