Maharashtra Speaker | नार्वेकरांच्या निर्णयाचं कौतुक, 'शिंदे-अजित पवार' प्रकरणाचा फडणवीसांनी दिला दाखला

मुंबईतील एका कार्यक्रमात, फेडरेशन ऑफ कॉर्पोरेट या संस्थेतर्फे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा नागरी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीसांनी सुरुवातीला इंग्रजीतून भाषण केले आणि नंतर उर्वरित पूर्ण भाषण मराठीतून केले. या भाषा बदलामागे नवीन शिक्षण धोरणातील त्रिभाषा सूत्रावर दिलेला भर हे एक कारण असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, मराठीतून बोलल्यास त्यांचे विचार आणि आणि भूमिका थेट संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत पोहोचतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. याच कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांनी राहुल नार्वेकर यांच्या कार्याचे कौतुक केले. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीच्या प्रकरणी नार्वेकरांनी दिलेल्या निर्णयाचा त्यांनी दाखला दिला. शिंदे हे 'ओरिजिनल शिवसेना' घेऊन बाहेर पडले, तर अजित पवार हे 'ओरिजिनल राष्ट्रवादी' घेऊन बाहेर पडले, अशा काळात कायद्याचे सखोल ज्ञान असणारे विधानसभा अध्यक्ष आवश्यक होते, असे फडणवीस म्हणाले. राहुल नार्वेकर यांची निवड योग्य होती हे त्यांनी आपल्या निर्णयांतून सिद्ध केले, असे फडणवीसांनी नमूद केले. सभागृह चालवण्याबरोबरच, अध्यक्षांना न्यायाधीशाचे काम करावे लागते आणि सुनावणी घेऊन निकालही द्यावा लागतो, असे त्यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाकडून प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवले जात असताना, अशा अनेक खटल्यांमध्ये नार्वेकरांची निवड योग्य होती, असे फडणवीसांनी म्हटले. "I was absolutely right in choosing him as Speaker," असे त्यांनी स्पष्ट केले. मुंबईतील आझाद मैदानात सुरू असलेल्या शिक्षकांच्या आंदोलनाला यश मिळाल्याची माहितीही या संदर्भात देण्यात आली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola