Special Report MLA Sanjay Gaikwad : आमदार गायकवाडांचा कँटीनमध्ये राडा, कर्मचाऱ्याला बेदम मारहाण!

Continues below advertisement
शिंदेंच्या शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी आकाशवाणी आमदार निवासाच्या कँटीनमध्ये कर्मचाऱ्याला मारहाण केली. मंगळवारी रात्री आमदार गायकवाड यांनी कँटीनमधून जेवण मागवले होते. जेवण खराब असल्याचे आढळल्यानंतर त्यांनी टॉवेल आणि बनियानवरच कँटीनमध्ये जाऊन कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटले. विरोधी पक्षांनी आमदार गायकवाड यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करण्याची आणि मुख्यमंत्र्यांनी कारवाई करण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे आमदार संजय गायकवाड हेच भोजन समितीचे अध्यक्ष आहेत, त्यामुळे जेवणाची गुणवत्ता सुधारण्याची जबाबदारी त्यांचीच होती. या प्रकारावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अन्न आणि औषध प्रशासनाच्या पथकाने कँटीनची पाहणी करून अन्नाचे नमुने गोळा केले आहेत. या सर्व टीकेनंतरही आमदार गायकवाड यांनी "मला केलेल्या गोष्टीचा काही याच्यामध्ये अजिबात पश्चाताप नाही" असे म्हटले आहे. त्यांनी विधानभवनातही हा मुद्दा मांडणार असल्याचे सांगितले. कँटीनचे कंत्राट महाराष्ट्राबाहेरील लोकांना न देता मराठी महिला बचत गटांना देण्याची मागणीही करण्यात आली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola